कोल्हापुरात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या पोहोचली १२२ वर 

39 corona positive patient in kolhapur
39 corona positive patient in kolhapur
Updated on

कोल्हापूर - गेल्या सहा ते सात दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संखेत रोजच भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्याही चिंतेत भर पडत आहे. मुंबईवरून कोल्हापुरात आलेल्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात बाधितांच्या संखेत भर पडत आहे. यात भर म्हणून की काय परवा, काल आणि आज या रूग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आज दिवसभरा ३९ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या ३९ रूग्णांसह आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कालपासून जिल्ह्याला धक्यावर धक्के बसत असतानाच आज आलेल्या 39 जणांच्या अहवालाने आणखीनच भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आज दिवसभरात ५ वाजून १५ मिनिटापर्यंत ३९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत १३ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

याबरोबरच जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 41 कोव्हिड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात 3 हजार 142 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात 4 हजार 111 बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग दक्ष आणि सजग असल्याचे स्पष्ट करून डॉ.साळे म्हणाले, जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 41 कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे 7 हजार 253 बेड तीन टप्प्यामध्ये आवश्यकतेनुसार तयार करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 3 हजार 142 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. 4 कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, यातील बऱ्याचशा रूग्णांना आधिच क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे जिल्हावासियांना जास्त धोका नाही. शिवाय रूग्ण संख्या वाढत असली तरी कोल्हापुकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने वाढवलेल्या लॉकडाऊनच्या नियम व अटींमध्ये कोल्हापूरला जैसे थे ऑरेंज झोनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे, कडक आणि सक्त नियमांचा रेडझोन कोल्हापूरकरांना वाट्याला आलेला नाही. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना लागू असणाऱ्या नियम अटींचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे.

राज्यातील रेडझोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समोवश आहे. तर पूर्वीचे जिल्ह्यात ग्रीनझोनमध्ये होते ते ग्रीनमध्यच आणि ऑरेंजमध्ये असणारे ऑरेंजमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता तो तसाच ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com